अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल."
धाराशिव शहर पोलीस ठाणे धाराशिव ते वैराग जाणारे रस्त्याजवळ सय्यद प्लॉटींग मध्ये भोगावती नदीचे काठाजवळ धाराशिव येथे अवैध कत्तलीतील गोवंशीय मांसाची वाहतुक होणार असल्याची गोपनीय खबर धाराशिव शहर पोलीस ठाण्यास दि. 19.01.2025 रोजी मिळाल्यावरुन धाराशिव शहर पो. ठा. च्या पथकाने नमुद ठिकाणी जावून 19.30 वा. सु. थांबले असता धाराशिव कडून वैरागकडे जाणारा आयशर टॅम्पो क्र. एम. एच. 11 डी.डी. 3883 हा पोलीसांनी संशयावरून थांबवून त्याच्या हौद्यात डोकावून पाहिले असता आत गोवंशीय मांस व बर्फाचे तुकडे दिसून आले. यावर पोलीसांनी नमूद ट्रकचा चालक- शाहरुख निसार पिंजारी, वय 27 वर्षे, माळी गल्ली नागनाथ रोड धाराशिव ता. जि.धाराशिव यांस त्या मांस वाहतुक परवाण्याबाबत विचारले असता परवाना नसल्याचे त्यांनी सांगीतले. यावर पथकाने अंदाजे 6,00,000 ₹ किंमतीच्या नमूद टैम्पोसह त्यातील अंदाजे 16,00,000 ₹ किंमतीचे सुमारे 3000 किलो गोवंशीय मांस जप्त करुन प्रयोगशाळा परिक्षणाकरीता पशुधन विकास अधिकारी, धाराशिव डॉ. श्री. कमलाकर शेळके यांच्यामार्फत मांसाचे नमूने काढले आहेत. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार- राम कनामे यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र प्राणि संरक्षण कायदा कलम 5 (सी), 9 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पो. ठा. चे प्रभारी शकील शेख, सपोनि कुकलारे, पोउपनि- संदीप ओव्होळ, पोहेकों / आनंत आडगळे, पोअं- राम कनामे, प्रविण जमादार, सुधीर मुगळे, चालक सपोफी हावळे, पोअं- जगताप यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या