पवनचक्की भाग २
पवनऊर्जा निर्मितीचे स्वतंत्र केंद्र म्हणून धाराशिव जिल्ह्याची ओळख होणार आहे.
अशी माहिती उपजिल्हाधिकारी शिरीष यादव यांनी दिली.
जिल्ह्याचे नैसर्गिक वातावरण वाहता यापेक्षा आणखी मोठे प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित केले जाऊ शकतात साधन संपदेचा विचार केला तर महाराष्ट्रातील उंचीवरचे ठिकाण आणि मोठा पठारी प्रदेश म्हणून जिल्ह्याची ओळख आहे या आणि अशा इतर अनेक विषयांनी जिल्हा संपन्न आहे..
हे झालं साधन संपदेच. . पण ज्यांचा या सर्वात मोलाचा वाटा आहे त्याचं काय?
जिथे हे सर्व प्रकल्प राबवण्यात येत आहेत तेथील स्थानिकांना , शेतकऱ्यांना , लोकप्रतिनिधी यांना विचारात घेतले आहे का ?
मोठा प्रकल्प म्हंटल की मोठी जागा आली यासोबतच बाकी स्थानिक पातळीवरच्या बाबी आल्या कमीत कमी या मार्फत तरी स्थानिक शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा.
उदा..
पुणे मुंबई सध्या महानगर म्हणून ओळखले जातात त्यात आता मेट्रो प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत. यात मात्र भरती करतांना स्थानिक युवकांना आवर्जून डावलण्यात आले असल्याचे चित्र पहायला मिळाले.
त्यांना आता रोजगारासाठी बाहेर पडावे लागत आहे.
क्रमशः
0 टिप्पण्या