ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे बावी गावात घाणीचे साम्राज्य; स्वच्छतेची ग्रामस्थांची मागणी

 


वाशी तालुक्यातील बावी गावात अस्वच्छतेचे चित्र; ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी


बावी, ता. वाशी :


गावात विविध ठिकाणी कचरा व घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. ग्रामपंचायतीकडून नियमित स्वच्छता केली जात नसल्याने गावातील सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या कडेला तसेच नाल्यांच्या परिसरात कचरा साचत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


गावातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात साचलेल्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीही ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.


ग्रामपंचायतीने गावातील कचरा तातडीने उचलून नाल्या व सार्वजनिक परिसराची स्वच्छता करावी, तसेच नियमित स्वच्छता व्यवस्था राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.


गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी ग्रामपंचायतीने ठोस उपाययोजना करून स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या