पवनचक्की - विकासाची गंगा की शेतकऱ्याच्या नरडीचा घोट?

धाराशिव तशी या जिल्ह्याची ओळख पुरातन आहे . अगदी जेव्हा devolopment नावाचा अर्थ लोकांना माहित नव्हता त्या काळी इथून परदेशी व्यापार सुरू होता. याच्या खुणा अजूनही आपल्याला तेर या ठिकाणी पाहायला मिळतात.
परंतु सध्या विद्युत निर्मिती साठी उभ्या केल्या जाणाऱ्या पवनचक्क्या ह्या वादाचा विषय ठरत आहे. विकासाच्या नावाखाली पडीक भावाने शेतकऱ्याच्या जमिनी लाटण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत , शेतकरी तक्रार घेऊन गेला तर लवकर त्याकडे लक्ष दिलं जात नाही, एकंदरीतच हा विनाशाचा प्रारंभ तर नाही ना हा प्रश्न मनात येतो. 

गेल्या काही दिवसांपासून ' पवनचक्की माफिया '  हा शब्द मोठ्या प्रमाणावर ऐकू येऊ लागला आहे.

शासनाचे ध्येय ऊर्जा निर्मितीत टक्का वाढवणे हे चांगले जरी असले तरीही योग्य मार्गाने त्याचा अवलंब होणे गरजेचे आहे . क्रमशः 

Vishwanath 

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

निनावी म्हणाले…
आवडल्यास नक्की लाईक करा