परंतु सध्या विद्युत निर्मिती साठी उभ्या केल्या जाणाऱ्या पवनचक्क्या ह्या वादाचा विषय ठरत आहे. विकासाच्या नावाखाली पडीक भावाने शेतकऱ्याच्या जमिनी लाटण्याचे प्रकार उघडपणे सुरू आहेत , शेतकरी तक्रार घेऊन गेला तर लवकर त्याकडे लक्ष दिलं जात नाही, एकंदरीतच हा विनाशाचा प्रारंभ तर नाही ना हा प्रश्न मनात येतो.
गेल्या काही दिवसांपासून ' पवनचक्की माफिया ' हा शब्द मोठ्या प्रमाणावर ऐकू येऊ लागला आहे.
शासनाचे ध्येय ऊर्जा निर्मितीत टक्का वाढवणे हे चांगले जरी असले तरीही योग्य मार्गाने त्याचा अवलंब होणे गरजेचे आहे . क्रमशः
1 टिप्पण्या